नांदुरा :- कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे त्यामुळे विवाह सोहळे बंद आहे . परंतु काही विवाह होणे अपेक्षित असताना प्रशासनाने काही अटींवर सूट दिली आहे .लॉक डाऊन चे नियमाचे पालन करून केवळ २० लोकांच्या साक्षीने फिजिकल अंतर ठेऊन नांदुरा येथे १९ मे रोजी आदर्श विवाह संपन्न झाला नांदुरा येथील श्री गजानन काजळे यांची मुलगी वधु वैशाली गजानन काजळे व खामगाव येथील श्री अरविंद रामकृष्ण एदलाबादकर यांचा मुलगा वर वैभव अरविंद एदलाबादकर यांचे शूभमंगल करण्यात आले यावेळी लंडन वरून पूजा कुलकर्णी मावस भगिनी यांनी विशेष शुभेच्या दिल्या कृष्णराव काजळे ,(मोठे बाबा) अनिल केळकर , योगेश केळकर , सुनील जोशी, अनिल जोशी, संजय कापसे , शुभम शुक्ला , मनीष जोशी, प्रशांत जोशी, यांनी विशेष ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा चा वर्षाव केला , या मुळे त्याची कमतरता भरून निघाली व आनंद द्विगुणित झाला
Social Plugin